consultation

लोणी बु.

ग्रामपंचायत

Location

सक्षम गाव, समृद्ध भविष्य

ग्रामपंचायत लोणी बुद्रुक – शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण प्रगती.

आधुनिक ग्रामविकास

स्वच्छता, डिजिटल सेवा आणि मजबूत पायाभूत सुविधा.

समृद्ध शेती व रोजगार

शेती विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीवर भर.

श्री. देवेंद्र फडणवीस

(मुख्यमंत्री, महाराष्ट्र)

श्री. एकनाथ शिंदे

(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)

श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार

(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)

श्री. जयकुमार गोरे

(पंचायतराज मंत्री, महाराष्ट्र)

श्री. एकनाथ डवले

(ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन)

सहकारमहर्षी

पद्मश्री. विठ्ठलराव विखे पाटील

(सहकार चळवळीचे आद्य प्रवर्तक)

आमचा अभिमान

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील

(माजी केंद्रीय मंत्री)

आमचे प्रेरणास्थान

मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील

(मंत्री, जलसंपदा महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री, अहिल्यानगर जिल्हा)

मा. सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील

(माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाराष्ट्र)

मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील

(माजी खासदार, अहिल्यानगर जिल्हा)

लोणी ग्रामपंचायत

विश्वास, सहभाग आणि विकास – लोणी ग्रामपंचायतीची ओळख

ग्रामपंचायत लोणी बु., ता. राहाता येथील सन २०११ च्या जनगणनेनुसार १२२९४ इतकी लोकसंख्या आहे. त्यात अनु. जाती / अनु. जमातीची लोकसंख्या २१५६ इतकी असून इतर १०१३८ इतकी आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २२३० हेक्टर इतके आहे. गावामध्ये म्हसोबा मंदिर, राम मंदिर, विठ्ठल रुक्माई चे जागृत देवस्थान आहे. गावी दरवर्षी दत्त जयंतीला ग्रामदैवत म्हसोबा महाराज देवाची यात्रा भरत असून, सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये मनोभावे सहभागी होत असतात.

गावामध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला. ​पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतक-यांच्या विकासासाठी सहकारी तत्वावर उभ्या केलेल्या पहिल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना मिळाली. पण गाव, तालुका व परिसरात विकासाच्या प्रक्रियेला वेगाने सुरुवात झाली ती आजही अविरत सुरू आहे

ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई या मोठ्या शहरांच्या ठिकाणी जावे लागायचे. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली. के.जी. पासून ते पी.जी. पर्यंत असलेल्या शिक्षणाने भूमीपुत्रांना लोणीतच उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली खरी पण आज दुसऱ्या देशातील व राज्यातील विद्यार्थीही लोणीत येऊन शिक्षण घेत आहेत त्यामुळे लोणी बुद्रुक शिक्षणाचे केंद्र बनले आहे.

शाश्वत विकास

शाश्वत विकासासाठी लोणी बुद्रुकची नऊ सूत्री वाटचाल

भारत सरकारच्या पंचायत राज विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोणी बुद्रुक ग्रामपंचायत शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी नऊ सूत्री संकल्पनांनुसार कार्यरत आहे.

गरिबीमुक्त व उपजीविका वृद्धी

रोजगारनिर्मिती व आर्थिक सक्षमीकरणावर भर.

आरोग्यदायी गाव

दर्जेदार आरोग्य सुविधा व जनजागृती.

बालस्नेही गाव

बालकांचे संरक्षण व सर्वांगीण विकास.

जलसमृद्ध गाव

पाणी संवर्धन व शाश्वत जलव्यवस्थापन.

स्वच्छ व हरित गाव

स्वच्छता व पर्यावरण संरक्षण.

स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा

रस्ते, वीज व मूलभूत सुविधा.

सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव

सामाजिक संरक्षण व न्याय.

सुशासनयुक्त गाव

पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन.

लैंगिक समतेला प्रोत्साहन

महिला सक्षमीकरण व समावेशक विकास.

गावाची लोकसंख्या (२०११ जनगणनेनुसार)

एकून लोकसंख्या

१२२९४

पुरुष

६२६१

महिला

६०३३
आमच्या सेवा

ग्रामपंचायत लोणी अर्ज फॉर्म

लोणी ग्रामपंचायत गावातील नागरिकांना विविध शासकीय व स्थानिक सेवा उपलब्ध करून देते. प्रत्येक सेवा पारदर्शक पद्धतीने व शासन नियमांनुसार दिली जाते. वरील पैकी कोणत्याही सेवे/ दाखल्या बद्दल माहिती हवी असल्यास खालील फॉर्म भरा.

सर्व प्रकारच्या शासकीय दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • तलाठी उत्पन्न चौकशी अहवाल
  • शेतजमीन असल्यास चालू तारखेचा ७/१२ व ८अ उतारा
  • सरकारी/अर्ध-सरकारी नोकरी असल्यास १६ नंबर फॉर्म
  • रेशनिंग कार्ड
  • ओळखपत्र (आधार / मतदान ओळखपत्र इ.)
  • पासपोर्ट साईज १ फोटो
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • लाईट बिल / घर मिळकत ८ उतारा
  • ओळखपत्र (आधार / मतदान ओळखपत्र)
  • पासपोर्ट साईज १ फोटो
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शेतजमीन ७/१२ आणि ८अ उतारा
  • प्रतिज्ञापत्र
  • रेशनिंग कार्ड
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शेतजमीनचे ७/१२ व ८अ उतारे
  • प्रतिज्ञापत्र
  • रेशन कार्ड
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
  • १०वी बोर्ड सर्टिफिकेट
  • वडिलांचा शाळेचा दाखला
  • रेशनिंग कार्ड
  • लाईट बिल / घर मिळकत उतारा
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • बोनाफाईड / जन्म दाखला
  • रेशनिंग कार्ड
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • वैद्यकीय अधिकाऱ्याचा वयाचा दाखला
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • बोनाफाईड / जन्म दाखला
  • वडिलांचा शाळेचा दाखला
  • वंशावळ पुरावा (७/१२, फेरफार उतारे)
  • रक्त नाते संबंधातील व्यक्तीची जात पुरावा
  • रेशनिंग कार्ड
  • ओळखपत्र
  • वंशावळ प्रमाणपत्र
  • २ पासपोर्ट फोटो
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • बोनाफाईड / जन्म दाखला
  • १०वी बोर्ड सर्टिफिकेट
  • वडिलांचा शाळा दाखला
  • रेशनिंग कार्ड
  • लाईट बिल / घर मिळकत उतारा
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • ज्या शेतात मजुरी केली त्याचा ७/१२ उतारा
  • प्रतिज्ञापत्र
  • शेतकऱ्याची संमती
  • रेशन कार्ड
  • भूमिहीन दाखला
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • बोनाफाईड / शाळा सोडल्याचा दाखला
  • ७/१२ उतारा (शेत जमीन असल्यास)
  • वडिलांचा शाळा दाखला
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल / घर उतारा
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
  • शेतजमीनचे ७/१२ उतारे
  • वडिलांचा शाळा दाखला
  • ३ वर्षांचा तहसिलदार उत्पन्न दाखला
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल / घर उतारा
  • ओळखपत्र