consultation

लोणी बु.

ग्रामपंचायत

Location

banner

आमच्या विषयी

लोणी बुद्रुक ग्रामपंचायत

ग्रामपंचायत लोणी बु.

ग्रामपंचायत लोणी बु., ता. राहाता येथील सन २०११ च्या जनगणनेनुसार १२२९४ इतकी लोकसंख्या आहे. त्यात अनु. जाती / अनु. जमातीची लोकसंख्या २१५६ इतकी असून इतर १०१३८ इतकी आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २२३० हेक्टर इतके आहे. गावामध्ये म्हसोबा मंदिर, राम मंदिर, विठ्ठल रुक्माई चे जागृत देवस्थान आहे. गावी दरवर्षी दत्त जयंतीला ग्रामदैवत म्हसोबा महाराज देवाची यात्रा भरत असून, सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये मनोभावे सहभागी होत असतात.
गावामध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला.
​पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतक-यांच्या विकासासाठी सहकारी तत्वावर उभ्या केलेल्या पहिल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना मिळाली. पण गाव, तालुका व परिसरात विकासाच्या प्रक्रियेला वेगाने सुरुवात झाली ती आजही अविरत सुरू आहे. ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई या मोठ्या शहरांच्या ठिकाणी जावे लागायचे. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली. के.जी. पासून ते पी.जी. पर्यंत असलेल्या शिक्षणाने भूमीपुत्रांना लोणीतच उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली खरी पण आज दुसऱ्या देशातील व राज्यातील विद्यार्थीही लोणीत येऊन शिक्षण घेत आहेत त्यामुळे लोणी बुद्रुक शिक्षणाचे केंद्र बनले आहे.
मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व सलोख्याने राहत आहेत. सर्व सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम कोणताही बंदोबस्त न घेता गावात साजरे केले जातात.
लोणी बु. गावामध्ये आरोग्य, कृषी, रोजगारनिर्मिती इतर मूलभूत सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत व विकासाची प्रक्रिया गतिमान पद्धतीने सुरू आहे.

गाव गाव
लोणी ग्रामपंचायत

ग्रामपंचायतीची यशस्वी वाटचाल व गौरव

  • सन २००७-०८ मध्ये लोणी बु. गावास निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • आतापर्यंत ग्रामपंचायतीस राष्ट्रीय व राज्य पातळीवरील २ कोटी ८० लाख रुपयांची बक्षिसे प्राप्त झाली आहेत.
  • ग्रामपंचायतीने १ कोटी १२ लाख रुपये रक्कमेची एफ.डी.आर. केलेली आहे.
  • दर मंगळवारी ग्रामस्थांमार्फत श्रमदान केले जाते.

गावातील प्रमुख विकास कामे व सुविधा

  • ३ जिल्हा परिषद शाळा व १५ अंगणवाड्या यांना सौर पंप बसवून आयएसओ नामांकन मिळवलेले आहे.
  • गावात २८० सौर पथदिवे बसविण्यात आलेले आहेत.
  • लोणी बु. गावात ५७ बचत गट कार्यरत असून सदर बचत गटांमध्ये ४४२५ महिलांचा समावेश असून बचत गटांमार्फत साईबाबांच्या फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती, लोबान, धूप, अष्टगंध इ. वस्तूंचे उत्पादन करण्यात येते, तसेच आवळ्याचे पदार्थ, पेपरबॅग तयार करणे.
  • बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी नारी भवन या भव्य वास्तूची उभारणी करण्यात आली आहे.
  • घनकचरा व्यवस्थापनासाठी गावाने स्वमालकीची २.५ एकर जागा खरेदी केली असून ग्रामपंचायतीच्या ४ घंटागाड्या व १ ट्रॅक्टर मार्फत ओला व सुका कचरा संकलित केला जातो. जिल्हा नियोजन समितीमार्फत ५ कोटी रुपये रकमेचा अद्यावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित केला आहे. ओल्या कचऱ्यापासून त्या ठिकाणी खत निर्मिती केली जात आहे.
  • गावातील सर्व घरे गटाराला जोडलेली असून सांडपाण्याचे वैशिष्ट्यपूर्ण नियोजन केलेले आहे.
  • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २.५० कोटी रुपये रकमेचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प काम प्रगतीपथावर आहे.
  • वय वर्षे ०-१२ व ६० वर्षांवरील रुग्णांना मोफत आरोग्य सेवा प्रवरा मेडिकल ट्रस्ट मार्फत पुरविली जाते.
  • लोकसहभागातून ६५ ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
  • ग्रामपंचायत कार्यालय व १५ हातपंप, बारवेवरची मोटार सौर ऊर्जेद्वारे कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच गावातील नळ पाणी पुरवठा योजना ८० केव्हीए सौर ऊर्जेवर कार्यान्वित करणेत आली आहे.
  • सन २०३० ची लोकसंख्या गृहीत धरून सुधारित जलजीवन मिशन अंतर्गत ६२.६३ कोटी रुपये रकमेची नळ पाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. ४४८ एम.एल.डी. क्षमतेची नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आली आहे. सदर पाणी पुरवठा योजना ८० केव्हीए सौर ऊर्जेवर कार्यान्वित असून नवीन ९८ केव्हीए सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर आहे.
  • ग्रामपंचायत कार्यालय परिसर वाय-फाय करण्यात आलेला असून आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले / ऑनलाईन कर भरणा इ. सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

गावातील वाड्या / वस्त्या

क्रमांक वस्तीचे नाव लोकसंख्या
1 बळीनारायण वस्ती 606
2 भालेराव वस्ती 1815
3 कुरकुटे वस्ती 726
4 लगाड वस्ती 847
5 लोणी बु. गावठाण 6995
6 म्हस्के वस्ती 1089
7 मुसळे वस्ती 1876

ग्रामपंचायतीस मिळालेली बक्षीसे

अ.नं. वर्ष मिळालेल्या बक्षीसाचे नांव क्रमांक रक्कम (लाख)
२००७/२००८ निर्मलग्राम पुरस्कार महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते - १०.००
२००८/२००९ संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता विभाग स्तर तृतीय ६.००
२००८/२००९ साने गुरुजी स्वच्छ शाळा प्रथम १.००
२००८/२००९ स्वच्छ अंगणवाडी प्रथम ०.५०
२००८/२००९ स्वच्छ दलित वस्ती जिल्हा स्तर द्वितीय ३.००
२००९/२०१० संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता जिल्हा स्तर प्रथम ०.२५
२००९/२०१० यशवंत पंचायत राज अभियान विभाग स्तर प्रथम ३.००
२००९/२०१० यशवंत पंचायत राज अभियान राज्य स्तर तृतीय ३.००
२००९/२०१० गौरव ग्रामसभा जिल्हा स्तर प्रथम १.५०
१० २००९/२०१० गौरव ग्रामसभा विभाग स्तर प्रथम २.००
११ २००९/२०१० संत गाडगेबाबा विभाग स्तर प्रथम १०.००
१२ २०१०/२०११ पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना पात्र १०.००
१३ २००९/२०१० स्वच्छ अंगणवाडी प्रथम ०.५०
१४ २००९/२०१० संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यस्तर द्वितीय १०.००
१५ २०११ विकासरत्न पुरस्कार महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते - -
१६ २०११/२०१२ स्वच्छ दलित वस्ती विभागस्तर प्रथम १०.००
१७ २०११/२०१२ पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना पात्र १०.००
१८ २०१२/२०१३ पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना पात्र १०.००
१९ २०१०/२०११ शाहू फुले आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती विभागस्तर द्वितीय ५.००
२० २०१३/२०१४ यशवंत पंचायतराज अभियान विभाग स्तर प्रथम ३.००
२१ २०१३/२०१४ यशवंत पंचायतराज अभियान राज्य स्तर द्वितीय ५.००
२२ २०१४/२०१५ संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता जि. प. गट स्तर प्रथम ०.०५
२३ २०१४/२०१५ संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पं. स. गट स्तर प्रथम ०.१०
२४ २०१४/२०१५ राजीव गांधी पंचायतराज सशक्तीकरण अभियान - ८.००
२५ २०१४/२०१५ यशवंत पंचायतराज अभियान विभाग स्तर प्रथम ३.००
२६ २०१४/२०१५ यशवंत पंचायतराज अभियान राज्य स्तर द्वितीय ५.००
२७ २०१५/२०१६ राजीव गांधी पंचायतराज सशक्तीकरण अभियान - १५.००
२८ २०१५/२०१६ संत गाडगेबाबा अभियान कुटूंबकल्याण पुरस्कार - ०.३०
२९ २०१५/२०१६ स्मार्ट ग्राम पुरस्कार तालुका स्तर प्रथम १०.००
३० २०१६/२०१७ संत गाडगेबाबा अभियान पं.स. स्तर प्रथम १.००
३१ २०१६/२०१७ संत गाडगेबाबा अभियान जिल्हा स्तर प्रथम २.५०
३२ २०१६/२०१७ संत गाडगेबाबा अभियान विभाग स्तर (आबासाहेब खेडकर कुटूंबकल्याण) - ०.३०
३३ २०१६/२०१७ राजीव गांधी पंचायतराज सशक्तीकरण अभियान - १५.००
३४ २०१६/२०१७ जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्रथम २०.००
३५ २०१७/२०१८ संत गाडगेबाबा अभियान जिल्हा स्तर प्रथम -
३६ २०१७/२०१८ संत गाडगेबाबा अभियान विभाग स्तर द्वितीय ४.००
३७ २०१७/२०१८ संत गाडगेबाबा अभियान राज्य स्तर द्वितीय २०.००
३८ २०१८/२०१९ नानाजी देशमुख ग्राम गौरव पुरस्कार प्रथम १०.००
३९ २०१८/२०१९ पं. दीन दयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामगौरव पुरस्कार - ५.००
४० २०२०/२०२१ माझी वसुंधरा अभियान राज्य स्तर पुरस्कार - ५०.००
४१ २०२०/२०२१ पं. दीन दयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत पंचायत सशक्तीकरण पुरस्कार - १५.००
एकूण २८०.५० लक्ष

प्रमाणपत्रे

certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate
certificate

लोणी बुद्रुक गावाची लोकसंख्या सांख्यिकी माहिती

खालील तक्त्यामध्ये लोणी बुद्रुक गावातील एकूण लोकसंख्या, बालकांची संख्या, अनुसूचित जाती व जमातींची माहिती तसेच साक्षर व निरक्षर नागरिकांची तपशीलवार आकडेवारी सादर करण्यात आली आहे. ही माहिती गावाच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीचे प्रतिबिंब दर्शविते.

(२०११ जनगणनेनुसार)
घटक एकूण पुरुष स्त्रिया
एकूण लोकसंख्या 12,294 6,261 6,033
अनुसूचित जाती (SC) 1,527 771 756
अनुसूचित जमाती (ST) 629 311 318
इतर मागासवर्गीय 3,218 1,577 1,641
इतर 6,920 3,374 3,546